समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लीम, वानखेडेंच्या अडचणी वाढणार

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु झाले होते त्यातच मलिक यांनी थेट समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. तसेच पत्रकार परिषदेत काही कागदपत्र सुद्धा दाखवली होती मात्र दुसरीकडे हे सर्व आरोप वानखेडे कुटुंबीयांनी फेटाळून लावत हिंदू असल्याचे म्हंटले होते.

मात्र आता या प्रकरणी अत्यंत महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे कोर्टात सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ड्रुग्स प्रकरणाच्या मुद्दयावरून सुरु झालेल्या या वादात नवाब मलिक यांनी पत्रकार परिषेद घेऊन समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नापासून ते त्यांच्या नोकरीसाठी दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते तसेच वानखेडे परिव हे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा दावा सुद्धा मलिक यांनी केला होता. मात्र दुसरीकडे या आरोपांना वानखेडे कुटुंबियांकडून सडेतोड उत्तर देण्यात आले होते

Team Global News Marathi: