समीर वानखेडेंनी दिल्लीमध्ये SC आयोगात कास्ट सर्टिफिकेट केले सादर,

 

नवी दिल्ली | मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सोमवारी दिल्ली गाठली. त्यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे पोहोचून त्यांच्या जातीशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांचीही भेट घेतली. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप करत आपली जात लपवल्याचा आरोप केला होते.

यापूर्वी समीर वानखेडे यांनी शनिवारी एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. रविवारी हलदर यांनी समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. यावर प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी हलदर यांच्याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुस्लिम असूनही दलिताचे खोटे जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर वानखेडे यांनी डीडीजी एनसीबीची भेट घेण्यासाठी दिल्लीतील कार्यालय गाठले. वानखेडे यांच्यावरील २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाची चौकशी एनसीबीची दक्षता शाखा करत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने आरोप केला आहे की, याच प्रकरणातील आणखी एक साक्षीदार केपी गोसावी याने समीर वानखेडेंच्या सांगण्यावरुन आर्यनला सोडण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितली होती

Team Global News Marathi: