अनिल देशमुखांना ईडीच्या कार्यलयात १०० दिवस राहावे लागणार – किरीट सोमय्या

 

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर झाले. तसेच त्यांनी ट्विट करून आय संदर्भात खुलासा केला होता. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अखेर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले, १०० दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा १०० कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेना किती? हे सांगावे लागणार,’ असे सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी त्याबाबत ट्विट करीत निशाणा साधला ते म्हणाले की, ‘अखेर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले. आता देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा १०० कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेना किती? हे सांगावे लागणारच. पहिली अटक जितेंद्र आव्हाडांची झाली आता अनिल देशमुखची होणार आणि पुढे नंबर आता अनिल परब यांचा लागणार.’

पुढे सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांना आता दर महिन्याला किती कोटी? आणि कुणाला किती कोटी पैसे पाठवले हे ईडीच्या चौकशीमध्ये सांगावेच लागणार आहे, किरीट सोमय्या यांनी मनी लॉंड्री प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची चौकशी लावली आहे. त्यामध्ये सोमय्या यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

Team Global News Marathi: