संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा- चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर | राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांवरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

‘मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने जुन्याच मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकारने तारखा दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर खासदार संभाजीराजेंनी त्या त्या तारखेला शब्द देणाऱ्यांचा शर्ट पकडावा,’ असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, संभाजीराजेंनी ज्या मागण्या आता केल्या होत्या, त्या कोणतीही खळखळ न करता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या होत्या. दोन वर्षे सलग ६५०- ६५० कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच या मंजूर केलेल्या योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे संभाजीराजे उपोषणास बसले.

महाविकास आघाडी सरकारने नव्याने काही केलेले नाही, जुन्या बंद झालेल्या योजनांना नव्याने मंजुरी दिली एवढेच आहे. तरीही राजे हे तितकं सोपं नाही. तुम्हाला ज्या तारखा दिल्या आहेत, त्या तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर शब्द देणाऱ्यांचे शर्ट पकडा, असे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: