संभाजी राजे छत्रपती  यांच्याकडून परिवर्तन क्रांतीला  ९ ऑगस्ट पासून तुळजापूर इथून सुरवात 

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत.येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं   निमित्त साधून या क्रांतीला सुरुवात होणार आहे. संभाजीराजेंनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली “क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात… भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…” असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आलं होतं.

 

या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं ट्वीट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Team Global News Marathi: