संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य’ ” वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप”

सांगली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीवरही काही निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र ठाकरे सरकारच्या पायीवारीच्या निर्बंधांना न जुमानता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिपंरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाने घणाघाती टीका केली आहे. आता त्या पाठोपाठ शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप सरकार करत आहे, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे. वारीचा मुक्काम जिथं जिथं होतो, त्या त्या गावात परिसरातील लोकांनी येऊन एकत्र मुक्काम करा. पोलीस अडवतील पण विरोध मोडून काढा, असंही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. याच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देलं. जय जय राम कृष्ण हरी गजर करत त्यांनी हे आंदोलन केलं आहे.

Team Global News Marathi: