समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू; राज्यपालांच्या वक्तव्याचे दानवेंकडून समर्थन

 

समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते अशा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समर्थन केले आहे. आता दानवे यांच्या या समर्थनामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून दानवे यांच्या या समर्थनामुळे त्यांच्यावे शिवप्रेमींकडून टीका होताना दिसून येत आहे.

कोश्यारी यांच्या त्या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निषेध झाला होता. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली.’आपण जे ऐकले आहे, शिकले आहे आणि वाचले आहे त्यानुसार समर्थ रामदास हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्याच्याशी कुणी सहमत नसतील तर त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. टीका करण्यात काहीच अर्थ नाही.’

असे दानवे म्हणाले. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केली होती. कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. आपल्याला जेवढी माहिती होती त्यानुसार आपण ते विधान केले होते. कुणाला अधिक माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी अशी सारवासारव कोश्यारी यांनी केली होती.

Team Global News Marathi: