त्याकाळी माझाही संबंध जोडला होता; शरद पवारांकडून नवाब मलिकांच पाठराखण

 

मुंबई | नवाब मलिकांवर कारवाई ही राजकीय हेतूनं करण्यात आली आहे. २० वर्षात कधी कारवाई झाली नाही आणि ते मुस्लीम आहेत म्हणून दाऊदशी संबंध जोडला जातो. माझ्यावरही तसे आरोप करण्यात आले होते. मात्र नारायण राणेंना वेगळा न्याय आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय का? असे पवारांनी विचारले आहे. त्यांना अटक झाली म्हणून राजीनामा मागतात मग आमचे सिंधुदुर्गचे माझी सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा घेतला हे माझ्या वाचनात आलं नाही.अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक या पध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रीमंडळातून काढा असं बोलताय. कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

पुढे पाच राज्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालाबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, पाच राज्य निवडणुकांत काय होईल हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मात्र काय होईल हे बघू काल मंत्रीमंडळात काय चर्चा झाली माहिती नाही मात्र जो काही निर्णय घेतली तो त्यांच्या हिताचा असेल. फोन टँपिंग होतायत हे मी स्वतः पाहिलंय. मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा या घटना घडल्यात. वरिष्ठ सांगतात म्हणून अधिकारी तसं करत होते मात्र याची किंमत अधिकाधिऱ्यांना चुकवावी लागेल. नाना पटोले काय म्हटले तो त्यांचा प्रश्न आहे.

Team Global News Marathi: