सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा २० वर्षांचा इतिहास बघा

 

मुंबई | अभिजीत बिचुकले हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले नाव मागच्या काही वर्षपासून ते राजकीय क्षेत्रात सुद्धा परिचित असलेले दिसून आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकले यांनी बिगबॉस शोमध्ये दाखल झाले होते. पहिल्या दिवसांपासून त्यांच्या आणि इतर सदस्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते तसेच यावरून सलमान खान याने बिचुकलेला फटकारले सुद्धा होता.

अशातच अभिजीत बिचुकलेने बिगबॉसला होस्ट करणारे सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा २० वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे.

बिचुकले म्हणाला,”बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने १४ शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा १५ वा शो मी चालवला, आणि इथे तो कमी पडला. त्याने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे.

Team Global News Marathi: