साखर उद्योगातील अडचणीसंदर्भात शिंदे-फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला

 

नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली. साखर उद्योगासमोर असणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील सकारात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

या चर्चेवर पुढच्या आठवडाभरातच सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच साखरेचा निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी देखील केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे या दृष्टीकोनातून अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचे शिंदे म्हणाले.

या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्माजी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजामुंडे, खासादर रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुजय विखे, खासादर धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन सहकारमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: