एनडीटीव्हीचा ताबा गौतम अदानी घेणार, ओपन ऑफरची किंमत पहा आणि खरेदी करा शेअर्स

 

भारतीय मीडिया कंपनी NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के मालकी वाटा खुल्या बाजारातून विकत घेण्याची अदानी समूहाची ओपन ऑफर आजपासून सुरू झाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहातील कंपन्यांच्या वतीने या ओपन ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनान्शिअल फर्म ने एका निवेदनात महितींडीली आहे की, ही ओपन ऑफर 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू केली जाईल, आणि 5 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहील.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवारी NDTV कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. .या कंपनीचे शेअर काळ दिवसा अखेर 382.20 रुपये किमतीवर बंद झाले होते.अदानी ग्रुपने या ओपन ऑफरसाठी लोकांना 294 रुपये प्रति शेअर किंमत देऊ केली आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी NDTV कंपनीमधील अतिरिक्त स्टेक खरेदी करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया/SEBI या स्टॉक मार्केट नियामकने अदानी समूहाच्या 492.81 कोटी रुपयेच्या ओपन ऑफरचा प्रस्ताव मंजूर केला होता.

प्रसिद्ध उद्योगपती आणि भारतातील सर्वात व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहाने ऑगस्ट 2022 मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड/VCPL या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले होते. VCPL या कंपनीने एक दशकापूर्वी NDTV कंपनीच्या संस्थापकांना 400 कोटी रुपयांहून जास्त कर्ज दिले होते, आणि या कर्जाच्या बदली एनडीटीव्हीच्या संस्थापकांनी VCPL या कर्जदाराला NDTV मधील 29.18 टक्के शेअर्स कधीही ताब्यात घेण्याची मुभा दिली होती.

Team Global News Marathi: