साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, सोमय्यांची मागणी

 

साई रिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपली आग्रही मागणी आहे. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही मोकळीक देणार नसल्याचे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी पालकमंत्री व आमदार ॲड. अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला जबाब नोंदवला आहे. ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. तसेच साई रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जोरात सुरु असून, ज्या दिवशी हे रिसॉर्ट तोडले जाईल त्यावेळी आपण स्वतः दापोलीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री असताना ॲड. परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर रिसॉर्टची उभारणी केली. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखवण्यात आले असून या प्रकरणातील खरेदी-विक्री केल्याचा तपशिल ॲड. परब यांनी का लपवला, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.

Team Global News Marathi: