‘तिन्हीही प्रकल्प त्यांच्यामुळेच गेले, कारण…’; बावनकुळेंचा तत्कालीन ठाकरे सरकारवर आरोप

 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीने सरकार हायजॅक केले होते.याची अस्वस्थता काँग्रेसचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. येत्या काळात पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे, असंही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं आहे. उद्धव ठाकरे आता काँग्रेसचे संविधान स्वीकारायचेच बाकी राहिलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारल्याने शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत, असा टोला त्यांनी लगावला

ते पुढे म्हणाले, की नवीन सरकारमध्ये फरक जाणवत असल्याचं लोक बोलतात. एक मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मात्र, आताचे मुख्यमंत्री हे मात्र 18 तास काम करत आहेत.महाराष्ट्र प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत आहेत. जनतेला आपला वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यरत आहेत, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

Team Global News Marathi: