सगळे प्रकल्प गुजरातला, महाराष्ट्रातील युवकांनी आरत्या, हनुमान चालीसा पठण करा – छगन भुजबळ

 

महाराष्ट्र राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग प्रकल्प गुजरातला जात आहेत. मात्र अशा प्रकल्प पळवापळवीमुळे राज्यातील युवकांचा रोजगार हिसकावला जात आहे.त्यामुळे राज्यातील युवकांनी आता करायचे काय तर? आरत्या करा, हनुमान चालीसा पठण करा दहीहंडी फोडा, फटाके फोडा अशी यादीच छगन भुजबळ यांनी सुचवली आहे.

आज सकाळपासून एअर बस संदर्भात टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशातच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले असून फडणविस याबाबत लक्ष घालून महाराष्ट्रातील प्रकल्प राज्यातच होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत एअर बसचा प्रकल्प याबाबत आपणही पाठपुरावा केल्याचे सांगत भूमिका मांडली. ते म्हणाले. एअर बस प्रकल्प हा 22 हजार कोटी ची गुंतवणूक असून पुढे वाढणार आहे. मागील वर्षी भारताने या कंपनीशी करार केला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2021 ला मी स्वतः रतन टाटा याना पत्र पाठवले. हा प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील H AL कारखान्यात तयार करा अशी मागणी केली होती. मात्र महाविकास सरकारच्या काळात आमच्याकडे अन्न पुरवठा पुरवठा खाते असल्याने, शिवाय कोरोना आल्यानंतर हा विषय बाजूला पडला. मी पत्र दिले मात्र त्याला उत्तर आले नसल्याचा निर्वाळा भुजबळांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले, एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरात ला जात आहेत. महाराष्ट्र मधील युवकांनी काय करायचे? आरत्या करा, हनुमान चाळीसा पठण करा, दहीहंडी खेळा असा जाब सल्ला यावेळी त्यांनी दिला. सरकार कोणाचे असो फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहेत. एकनाथ शिंदे करू शकणार नाही, पण देवेंद्र करू शकले असते. मोदींनी देशाचे नेते म्हणून वागले पाहिजे, गुजरातचा विकास आधीच घडला असे म्हणतात मग आता प्रकल्प नेण्याची गरज काय? दिल्लीत जे नेते काम करत आहेत, त्यांनी लक्ष घातले पाहिजे होते. आता आम्ही प्रयत्न केले तरीही झालेला निर्णय मागे घेतला जाईल का याबाबत साशंकता असल्याचे म्हणाले.

Team Global News Marathi: