सदाभाऊ खोत यांनी घेतली नाशिक येथे मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट

 

नाशिक | आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती. अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मनसेच्या बैठकीपूर्वी आज अमित ठाकरे आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट झाली.

सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे शेतकऱयांना न्याय देतील असा विश्वास यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत दोघेही सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा आहे.

दरम्यान आज नाशिकमधील मनसे पदाधिकारी अनंता सूर्यवंशी यांच्या वडिलांचे निधन झाले. याची माहिती मिळताच अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेत, पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि कुटुंबियांच सांत्वन केलं.तसेच येणाऱ्या आगामी नाशिक आणि पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीववर मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Team Global News Marathi: