भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस, राऊत यांनी घेतली भेट

 

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते. तसेच नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवला होता. हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नासिक पोलीस हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचा शोध घेत आहे. याच पसरहवभूमीवर राऊत यांनी नाशिक आयुक्तांची भेट घेतली आहे.

भाजप कार्यलय फोडणारे शिवसैनिक काल संजय राऊत यांच्या सोबत असल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. भाजप कार्यलय फोडणारे दीपक दातीर, बाळा दराडे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांच पथक रवानाही झालं होतं. मात्र, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राऊत दीपक पांडे यांच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आलं. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पांडे चांगले अधिकारी आहेत. मला अशा अधिकाऱ्यांना भेटणे आवडते. ते कायद्याशी तडजोड करत नाहीत असा माझा अनुभव आहे, असं राऊत या भेटीनंतर म्हणाले.

भाजपच्या कार्यालयावर हल्ला करणारे काही शिवसैनिक काल मुंबईत आले होते. या शिवसैनिकांनी राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज राऊत नाशिकमध्ये आले असून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर राऊत पांडे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Team Global News Marathi: