सचिन वाझे याला आता एनआयए PPE किट घालून चालायला लावणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांची तब्येत बिघाल्यामुळे रात्री उशिरा NIA कार्यालयात डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.

या प्रकरणी आता आणखी एक माहिती पुढे येत आहे. सचिन वाझे यांना घडलेल्या घटनेच्या ठिकाणी PPE किट घालून NIA अधिकारी चालायला लावणार आहे. हा त्यांच्या तपासाचा एक भाग आहे.अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक आढल्यानंतर तेथे एक व्यक्ती PPE किट घालून वावरताना आढळून आला होता हा व्यक्ती सचिन वाझेच आहे असा NIA अधिकाऱ्यांचा संशय आहे.

कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना आढळून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी PPE किट घातल्याचे दिसून आले होते.
ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना PPE किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध NIA चे अधिकारी घेतील. त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Team Global News Marathi: