मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाणार, राज्य सरकारच्या अडचणी वाढणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ या संपूर्ण प्रकरणात प्रकाशझोतात आलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा लवकरचं एनआयएकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या एनआयए केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर एटीएस पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास करत आहे मात्र आता लवकरच हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए आपल्या हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Team Global News Marathi: