सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम करायचा – नारायण राणे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. यावरून आता संपूर्ण विरोधक आघाडी सरकारवर तुटून पडले आहे.

त्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर सतत टीका करणारे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाई का केली नाही असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

सचिन वाझेला पोलीस खात्यात रुजू कोणी केलं, त्यांना सर्व जबाबदारी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे होते. परबीर सिंहाचा आरोप हा मुख्यमंत्र्यांवरही आहे, गेली अनेक दिवस वाझे ऑबेरॉयमध्ये राहायचे, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.

Team Global News Marathi: