‘मृत्यूचं भांडवल करणं ‘त्यांनाच” जमतं’ पुन्हा रुपालीताई चाकणकर यांचा भाजपाला टोला !

उत्तर प्रदेशात नदीच्या घाटावर १०० च्यावर मृतदेह आढळून आल्यानंतर एकाच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातुन मोदी सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली होती. दरम्यान, बिहार प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. या घटनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. हे मृतदेह करोना बाधितांचे असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.

 

 

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी, बिहारमध्ये काल गंगा नदीत १०० पेक्षा जास्त प्रेत तरंगताना आढळून आले. बिहार सारखी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पातळ एक केले असते. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती… मृत्यूचं भांडवल करणं ‘त्यांनाच’ जमतं…’असे त्यांनी म्हटले आहे.

 

पुढे आणखी एक ट्विट करत राज्यातील भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला आहे. त्यात त्यांनी काल गोव्यात झालेल्या ऑक्सिजन गळतीचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी, ‘काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत.’ असे म्हटले आहे.

Team Global News Marathi: