“सोनिया गांधी सामनाची दखल घेतात” नाना पटोले यांच्या टीकेला संजय राऊत यांचा टोला !

मुंबई : संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. आता पटोले यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आता संजय राऊत यांच्या या टिकेवरून पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा सामनाने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला, असे देखील संजय राऊत यांनी बोलून दाखविले होते.

आज राहुल गांधींचा लढा हा एकाकी आहे. राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड घाणेरड्या शब्दांत टीका होत असतानाही ते त्यांच्या मुद्द्याला धरुन राहतात. कोरोना काळात राहुल गांधींनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन सरकारने टीकेची झोड उठवली, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून राहूल गांधी यांची स्तुती केली होती.

Team Global News Marathi: