मीडियाला हात जोडून विनंती, पूजाचे खाजगी फोटो दाखवू नये – रुपाली ठोंबरे

सध्या राज्यात टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात विरोधकांनी सुद्धा आघाडी सरकारवर बेचूड आरोप केले होते. त्यातच प्रसार माध्यमे रोज पूजा चव्हाण हिचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपला टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर आता मनसेच्या रुपालीताई ठोंबरे यांनी भाष्य केले आहे.

पूजाचे पर्सनल फोटो प्रसारित केल्याने, आमच्या लेकींवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियाने पूजाचे पर्सनल फोटो दाखवणे बंद करावे, अशी विनंती रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
रुपाली ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट –

आमची मीडियाला हात जोडून विनंती आहे, आता त्या पूजा चव्हाण केस मध्ये अजून पर्सनल तिचे फोटो दाखवू नये. आमच्या लेकींवर त्याचा परिणाम होतोय चुकीचा मेजेस जातोय हो. खूपच चुकीचा संदेश जातो समाजात. जे पुणे पोलिसांना नाही समजले ते सर्व जनतेला कळाले आहे.

खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे. आपण एक लोकप्रतिनिधी असून त्यांनी जवाबदारीने वागणे गरजेचेच होते. अश्या पध्दतीचे शेण खाऊन समाजात घाण पसरवत आहे. गरीब मुलीच्या आयुष्यच वाटोळे करत आहेत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर राहूच नये, जनाची नको मनाची लाज ठेवा.

पैशाच्या जोरावर अवघी 20 ,22 वर्षाची मुलगी भुलवता किंवा ती भुलली ही पुजाची चूकच आहे. तिला समजवणारे, चांगले सांगणारे भेटलेच नसतील पण तुमचे काय तुम्ही तर जेष्ठ नेते ,लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्हाला अक्कल नव्हती का? का तुम्ही वेळीच पूजा रोखले नाही, लांब केले नाही. तुमच्या कृत्याची आमच्या लेकी बाळींना चुकीचे ,घाण दाखले नकोत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर नसले पाहिजे. आपली पात्रता नाही त्या पदावर राहण्याची, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

तसेच, पत्रकार,मीडिया यांना विनंती कृपया पूजा चव्हाण केस चे अजून खाजगी फोटो टाकून तारुण्यात येणाऱ्या तरुणींना चुकीचा मेसेज जाऊन देऊ नये हीच विनंती.

Team Global News Marathi: