हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवा

राज्यात वाढत असलेल्या कोरोनच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यात मराठी भाषा दिनानिमित्त दरवर्षी मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचे आयोजन करण्यात येते, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून आयोजक अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मात्र अमेय खोपकरांना नोटीस पाठवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेना चांगलीच आक्रमकझालेली पाहावयास मिळत आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

” हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच” असं विधान देशपांडे यांनी केले आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता, तरीही सरकारने कोरोनाचे कारण देत परवानगी नाकरली पण कारवाई करणार असल्याचा धाक दाखवल्याचा आरोप खोपकर यांनी केला आहे.

Team Global News Marathi: