पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ रुपाली चाकणकर यांनी साधला निशाणा !

 

सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसूक केंद्र सरकारबद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपले पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावे लागत आहे अशी टीका भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. आता चित्र वाघ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार टोला लगावला आहे

शिवसेनेचं नेमकं धोरण काय आहे ते जनतेला माहिती झालं आहे. औरंगाबादचं नाव संभाजी नगर करणारच येथून यांची सुरुवात झाली. करोनामध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना ५० लाख देणार, एमपीएससीच्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार, टाळेबंदीच्या काळातील वीजबिलं माफ करणार,” अशी यादीच वाचून दाखवत चित्रा वाघ यांनी फटे लेकिन हटे नाही असा टोला लगावला.

चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या ‘फटे लेकीन हटे नही’ ची तर पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: