“सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या फसव्या व जनविरोधी कारभाराच्या विरोधात आमदार भातखळकर यांचे आंदोलन “

 

मुंबई | मालाड पूर्व येथील जनतेच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेले पादचारी पुलाचे काम स्थानिकांच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आल्याचे सांगून आज ३ महिने उलटुन गेल्यानंतरही या पुलाच्या कामाकरिता उभारलेले बॅरिकेड्स हटवण्यास टाळाटाळ करत स्थानिकांना त्रास देण्याचे काम महानगरपालिकेने चालविले होते. सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या या फसव्या व जनविरोधी कारभाराच्या विरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आज आंदोलन करत रद्द झालेल्या मालाड पूर्व पादचारी पुलाचे बॅरिकेड्स हटविले.

मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोड आकाराने लहान असल्यामुळे आप्पापाडा, कुरार गाव, तानाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी व मालाड येथे दैनंदिन कामकाजासाठी पायी येण्याकरिता जिकरीचे झाले होते, त्यामुळे मी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करून पादचारी पूल मंजूर करून आणला खरा परंतु स्थानिक रहिवासी व व्यापारी यांचा विरोध लक्षात घेत हा पादचारी पूल रद्द करण्याचे ठरविण्यात आले. विकासात राजकारण करण्यात तरबेज असलेल्या पालकमंत्री आदित्य ठाकरे, ज्यांचा मालाड पूर्वशी काहीही संबंध नाही असे मंत्री असलम शेख यांनी हा पादचारी पूल रद्द करण्यात आल्याचे घोषित केले, मात्र कंत्राटदाराशी झालेल्या ‘अर्थपूर्ण संवादामुळे‘ कोणतेही कायदेशीर किंवा कार्यालयीन आदेश दिले नाही. अगोदरच आकाराने लहान असलेल्या दफ्तरी रोडवर उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे तासंतास वाहतूक कोंडी होत आहे.

मात्र यातही धक्कादायक बाब म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतांवर डोळा ठेऊन मागील पाच वर्षांत पहिल्यादांच मालाडला आलेल्या महापौरांनी महानगरपालिकेचे काम असताना व या पुलाच्या कामाशी काहीही संबंध नसलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना बोलवून जनतेच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याचे वक्तव्य केले. स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता जनतेला खोटे बोटायचे आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या जनतेला सूडबुद्धीने त्रास द्यायचा हा एककलमी कारभार शिवसेना-कॉंग्रेस कडून केला जात असून पुढील आठ दिवसांत या रस्त्यावरील बॅरिकेड्स महानगरपालिकेने हटविले नाही तर जनतेच्या सोयीकरिता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वतः सर्व बॅरिकेड्स हटवतील असा इशारा सुध्दा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.

Team Global News Marathi: