सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ ; ओमिक्राॅन विषाणूची धास्ती ,जाणून घ्या आजचे दर

मुंबईत : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्राॅन हा करोनाचा आतापर्यंतचा घातक विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात प्रचंड खळबळ माजली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे.आज सोमवारी सोने ३६० रुपयांनी महागले तर चांदीमध्ये ६५० रुपयांची वाढ झाली आहे.

कमॉडीटी बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या ४८२६७ रुपये असून त्यात ३०७ रुपये वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३५३५ रुपये असून त्यात ५७० रुपये वाढ झाली आहे.

याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना सोनं २२१ रुपयांनी महागले होते. १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७९९५ रुपरुपयांवर स्थिरावला होता. गुरुवारी सोन्याचा भाव ४७४२१ रुपयांवर स्थिरावला होता.

बड्या देशांनी ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची तयारी सुरु केली आहे. जगभरातील संशोधकांच्या मनात धडकी भरवली आहे. करोना पूर्णपणे बरा होणारे अद्याप खात्रीशीर औषध विकसित झालेले नाही. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३१० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४८३१० रुपये आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१३८० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५०५ रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये इतका आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: