‘आरआरआर’ चित्रपटाचा शो सुरू असताना प्रेक्षकांनी फोडल्या काचा

 

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. हा चित्रपट रिलीज झाला असून संपून देशभरात चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.चित्रपटाचा शो सुरू असताना काही लोक थिएटरमध्ये नाचत आहेत तर काही शिट्या टाळ्या वाजवत आहेत.

हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी काही थिएटरच्या मालकांनी विशेष काळजी घेतली होती. थिएटरच्या मालकांनी आरआरआर रिलीज होण्याआधी चित्रपटगृहांमधील स्क्रिनसमोर खिळे ठोकण्याचा निर्णय घेतला. पण एका थिएटरमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये असणाऱ्या खिडक्यांच्या काचा फोडायला सुरूवात केली.

सौमिथ यक्काटी यांनी एक व्हिडीओ शेअर करून या घटनेबद्दल माहिती दिली. काही तांत्रिक अडचणीमुळे विजयवाडामधील थिएटरमध्ये सुरू असलेला आरआरआर चित्रपटाचा शो बंद करण्यात आला. चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहात तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Team Global News Marathi: