रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीत घोटाळा; चौकशी झालीच पाहिजे’

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच जरंडेश्‍वर साखर कारखान्याची विक्री करण्यात आली आहे. जरंडेश्‍वर कारखान्यासह इतर १४ साखर कारखान्यांची विक्री झाली. हे कारखाने भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षातील नेत्यांबरोबरच इतर उद्योजकांनीसुद्धा विकत घेतले आहेत.

या 14 साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक बोली लावून म्हणजे ६५ कोटी ७५ लाख रुपयांना हा कारखाना गुरू कमोडीटीजने विकत घेतला. तर जरंडेश्‍वर एवढीच गाळप क्षमता असलेले कारखाने अवघ्या ४ कोटी ते १३ कोटी रुपयांना विकले गेले, अशी परिस्थिती असताना फक्‍त जरंडेश्‍वर कारखान्याची चौकशी का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

तर आता यावर ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करून या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये रोहित पवार यांनी घोटाळा केला आहे.

कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन ५० कोटी रुपयांना रोहित पवार यांनी विकत घेतला. याचा संपूर्ण तपास व्हायला हवा. या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

Team Global News Marathi: