पहाटे चार वाजता रोहित पवार पोहचले एपीएमसी मार्केटमध्ये

पहाटे चार वाजता रोहित पवार पोहचले एपीएमसी मार्केटमध्ये

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची पद्धत साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री पवार वेळेचे पक्के आहेत.सप्टेंबर महिन्यात पहाटे सहा वाजता पुणे मेट्रो स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. आता त्यांच्या या कामाची पद्धत आमदार रोहित पवार अवलंबताना दिसत आहे आहे.

रोहित पवार हे पहाटे चार वाजताच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. पहाटे-पहाटे त्यांनी एपीएमसीमधील भाजी आणि फळ मार्केटचा दौरा केला. यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसेच गावाकडून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला.

रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असे वचन पवारांनी यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे येणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत रोहित पवार सक्रिय होणार असेच दिसून येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: