AU अर्थात आदित्य ठाकरे नसून अनया उदास असा अर्थ आहे, रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण
सिने-अभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षाने लावला होता. त्यातच सुशांत राजपूत यांची कथाकथित प्रेयसी हिच्या मोबाईलमध्ये AU नावाने नंबर सेव असल्यामुळे सदर नंबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता.
मात्र या आरोपाचे खंडन करत खुद्द रिया चक्रवर्तीने स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी आपण आदित्य ठाकरे ह्यांना ओळखत नाही असे सुद्धा रियाने सांगितलं होत आता पुन्हा तिने AU नावाने सेव असलेल्या नावाचा खुलासा केला आहे. सदर नंबर अनया उदास या मैत्रिणीचा असल्याचे रियानं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.