वडिलांना ‘कृषीरत्न’ पुरस्कार जाहीर, रोहित पवारांनी असे केले वडिलांचे अभिनंदन

वडिलांना ‘कृषीरत्न’ पुरस्कार जाहीर, रोहित पवारांनी असे केले वडिलांचे अभिनंदन

मुंबई : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वडिलांना अर्थात राजेंद्र पवार यांना २०१९ चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला. यासंदर्भात माहिती स्वत: रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

आता त्या पाठोपाठ मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपल्या वडिलांचे अभिनंदनही आमदार रोहित पवारांनी केले आहे. दरम्यान, राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ”कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – २०१९’ बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला. या सन्मानाबद्दल बाबांचं आणि इतरही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचं मनःपूर्वक अभिनंदन!’, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: