रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरीवाल्यांच्या नावानं अपमान करण्यास मनसेचा विरोध

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या डजनभर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात बंड पुकारले आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला ठाकरेंसह संजय राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. संजय राऊत अनेकदा आक्रमक भाषा वापरत आहेत. हे आमदार राजकारणात येण्याआधी काय करायचे त्याचा पाढा वाचत आहेत. शिवाय बंड केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ते आधी जे काम करायचे तेच काम करायला पुन्हा पाठवू, असं संजय राऊत म्हणाले.

आता राऊतांनी केलेल्या या टिकेवर त्यावर आता मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तुमच्या राजकीय वादात रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरी चालवणारे अशा सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांचा अपमान करू नका.गुवाहाटीतील आमदारांना परत ते काम करायला पाठवू, असं शिवसेना का म्हणत आहे. हे काम हीन आहे का? अशाच लोकांच्या आशीर्वादावर पक्ष उभा राहिला हे विसरू नका!’ असं ट्विट मनसेचे (MNS) प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केलं आहे.

खैरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘तुमच्या राजकीय वादात रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरी चालवणारे अशा सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांचा अपमान करू नका.गुवाहाटीतील आमदारांना परत ते काम करायला पाठवू, असं शिवसेना का म्हणत आहे. हे काम हीन आहे का? अशाच लोकांच्या आशीर्वादावर पक्ष उभा राहिला हे विसरू नका!’ असं ट्विट योगेश खैरे यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: