मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो, आदित्य जी हे आपण कसं बरं विसरलात?

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या डजनभर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात बंड पुकारले आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात येत आहे अशातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

रविवारी शिवसेनेचा सांताक्रूझमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुवाहटीमध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. या आमदारांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना पुढच्या निवडणुकीत आपण पाडणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्त्व्यावर सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्य जी हे आपण कसं बरं विसरलात..???’ असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

कालच्या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गुवाहाटीला गेलेले 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात आहे. फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे खातं असतं ते खातं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मग त्यांना कमी काय केलं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: