राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच पत्र |

 

मुंबई | कोरोना असंर्घाच्या पार्श्वभूमीवर यंदा ५ जुलै आणि ६ जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी केली होती. त्यानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक आठवण करून दिली आहे.

येत्या ५ दिवसात पावसाळी अधिवेशन येऊ घातलं असताना अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला आठवण करून दिली आहे. महाविकास आघाडीच्या खाते वाटपानुसार विधानसभा अध्यक्षपद सध्या काँग्रेसच्या खात्यात आहे.

मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडलं होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद पद रिक्त आहे. त्यावर लवकर निर्णय घेण्याची गरज असल्यानं त्यांनी हे पत्र पाठवल्याचं सांगितलं जातंय. पत्र पाठवून त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. यावर आता आघाडी सरकारमधील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: