निर्बंध झुगारून पोलीस बंदोबस्तात ठाणे, मुंबईत मनसेने दहीहंड्या फोडल्या

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर बंदी घातली होती. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपासह मनसेने सुद्धा जोरदार विरोध केला होता. त्यातच ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या.

रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडली. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे मनसेने म्हटले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडण्यात आली. यावेळी अभिजीत पानसे व अविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर थोडी झटापट देखील झाली. भगवती शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी २५० कार्यकर्ते होते.

आम्ही जे ठरवतो ते करतो, दहीहंडी उत्सव साजरा होणारच, असे मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी सांगितले होते. तसेच बाहेरील राज्यांतून आम्हाला फोन येतात, महाराष्ट्रात दहिहंडी साजरी झालीच पाहिजे, राज ठाकरेंनी ती करावी, अशी मागणी होते असेही जाधव यांनी सांगितले. तर अभिजित पानसे यांनी आम्ही मराठी सण साजरा करणारच असे म्हटले होते.

Team Global News Marathi: