डेल्टा प्लसचा धोका वाढतोय! संपूर्ण राज्यच तिसऱया स्तरात

डेल्टा प्लसचा धोका वाढतोय! संपूर्ण राज्यच तिसऱया स्तरात

ग्लोबल न्यूज : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे

आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.

आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन नियमावली नुसार तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच घेतलेल्या सात जिह्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांना निर्बंध शिथिल करण्याची घाई करू नका, असे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचनांनुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचे प्रमाण कितीही कमी असले, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱया गटाच्या वरच असणार आहेत.

डेल्टा प्लस किती घातक?

जिनोम सिक्वेन्सिंग लॅबने काढलेल्या निष्कर्षांनुसार डेल्टा प्लस हा विषाणू शरीराला घातक आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने म्हणजे 60 टक्क्यांपेक्षाही अधिक वेगाने पसरतो. फुफ्फुसांच्या पेशींना घट्ट चिकटण्याची क्षमता यामध्ये आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती अधिक वेगाने कमी होत असून ऑण्टिबॉडीजची संख्याही घटत असल्याचे दिसून आले आहे. सध्या हा विषाणू रत्नागिरी, जळगाव तसेच अन्य काही जिह्यांत सापडल्याने कठोर निर्बंध लावण्याची गरज मुख्य सचिवांनी वर्तवली आहे.

काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी तिसऱया स्तरावरील बंधनांसह त्याहून उच्च दर्जाची बंधने किंवा अधिक बंधने लागू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील.
जेव्हा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असेल तर सध्या स्थानिक प्रशासनाने अधिक कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करा.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठय़ा प्रमाणावर कराव्यात.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करावी.

कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोटय़ा क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.

विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारावरच निश्चित करण्यात यावा. यासाठीची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.
सर्व शहरे आणि जिह्यांत साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट, ऑक्सिजन खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी निर्बंध तिसऱया स्तराइतका ठेवावा.
कोरोनाचा प्रसार रोखून बंधने शिथिल करताना लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करावे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टेस्ट–ट्रक–ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.
डेल्टा आणि आता डेल्टा प्लस या नवीन अधिक घातक विषाणूचा फैलाव होऊ लागला आहे. यामुळे येत्या चार ते सहा आठवडय़ांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची शक्यता मुख्य सचिवांनी व्यक्त केली.

50 लाख संक्रमित होतील!

राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेत 50 लाख लोक संक्रमित होण्याचा धोका आहे. लहान मुलेदेखील प्रभावित होण्याची शक्यता असून जवळपास 5 लाख बाधित होतील, असा अंदाज असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

काय म्हणाले शिंगणे…

या लाटेत जवळपास 50 लाख लोक संक्रमित होतील, तर साधारण 8 लाख ऑक्टिव रुग्ण राहतील असा अंदाज आहे.

या लाटेत लहान मुलेदेखील संक्रमित होण्याची चर्चा आहे. यातील 2.5 टक्के बालके शासकीय रुग्णालयात दाखल होतील, तर 3.5 टक्के बालकांना बालरोग तज्ञांकडून उपचार करण्याची गरज पडेल.

दुसऱया लाटेत रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासंदर्भात काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या. यावेळी आरोग्य सुविधांत कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: