मराठा आरक्षण | ….अन्यथा विधानभवनाला घेराव घालू, नारायण राणेंचा इशारा

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारवर सतत टीका करणारे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते नवी मुंबई येथेपत्रकार माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालू, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. शुक्रवारी नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत ते बोलत होते. पाच कोटी मराठा समाज आहे त्यातून एक कोटी समाजाचे लोक जरी एकत्र आले तरी महाराष्ट्र बंद होईल. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राणे म्हणाले की, मी आरक्षण विषयक समितीचा अध्यक्ष झाल्यावर राज्यातील विविध जिल्ह्यातील १८ लाख लोकांचा आणि सुमारे साडेचार लाख कुटुंबांचा सर्वे केला होता. मागासवर्गीय आयोगाने त्याला मान्यताही दिली होती. आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे पुनर्याचीक दाखल व्हायला पाहिजे. हे सरकार मराठा समाजाला कधीच आरक्षण देणार नाही. आपआपसात झुंजवता येईल तेवढे सरकार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Team Global News Marathi: