बार्शी बाजार समितीचा आदर्श घेऊ, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गौरवोद्गार

 

धाराशिव | कोणत्याही शहराचे वैभव हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनच होते. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आदर्श मोठा असून हाच आदर्श आपण घेऊ. एखाद्या जिल्ह्याला लाजवेल अशीही बाजार समिती असल्याचा गौरव यावेळी त्यांनी केला. तालुक्याच्या दृष्टीने बाजार समितीचे कार्यही अभिमानाची गोष्ट आहे. बार्शीने नेहमीच आपल्याला साथ दिल्याने आपणही बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महावीर स्वामी भगवान व्यापारी संकुल, भगवान श्री आदिनाथ तीर्थंकर व्यापारी संकुल, ५० लाख रुपये खर्चून तयार केलेला सौरऊर्जा प्रकल्प या कामाचे उद्घाटन आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बाजार समिती आवार लातूर रोड येथे दिगंबर वासुदेव नारकर शीतगृह बांधणे, शेतकरी निवास बांधणे, जनावर बाजारासाठी निवारा शेड बांधणे, अशा विविध नियोजित कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

निंबाळकर म्हणाले, धाराशिव जिल्हा असतानाही तेथील बाजार समितीपेक्षा बार्शी बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय आहे. या बाजार समितीचा आदर्श घेऊन येथील आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उस्मानाबाद उत्पन्न बाजार समितीमध्ये कायापालट कायापालट करू. टेंभुर्णी पासून उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन ही निंबाळकर यांनी यावेळी दिले.

Team Global News Marathi: