राजीनामा देऊन मेहरबानी केली नाही गुन्हा दाखल व्हावा, निलेश राणे यांची मागणी

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नाव आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राठोड यांनी कालच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला आहे. यावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

राणे म्हणाले की, राजीनामा देऊन राठोड याने काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षात बसलेल्या भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली आहे.

तसेच वनमंत्र्यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला होता मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे सुद्धा पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले. त्यात आज राठोड प्रकरणी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्याची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राजीनाम्यावर काय निर्णय घेण्यात येणार आहे हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: