तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, मराठा महासंघाचा इशारा

सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाची साजरी होणारी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी न करता अत्यंत सध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या निर्णयावर विरोधकांबरोबर मराठा संघटनांनी सुद्धा आक्षेप घेतला होता.

त्यात आता या निर्णयाविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत, करोना काळातही राजकीय मेळावे, निवडणुका होत होते. त्यामध्ये गर्दीवर बंधन नाही. मग, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांची उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी सरकारला इशारा वजा समाज दिली आहे. शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती कार्यक्रमास केवळ १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. प्रभातफेरी, बाइक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

Team Global News Marathi: