आरक्षणाबाबत न्यायालयासमोर बाजू मांडण्यास आघाडी सरकार अपयशी ठरले – चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा आरक्षण मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटतचं नाही अशी टीका त्यांनी केली होती. ते आज पत्रकार माध्यमांसमोर विधानभवनाच्या परिसरात मुंबई येथे बोलत होते.

सरकारमधील मोठे मंत्री असा विवाद करतात की तुमच्या काळात लावलेले वकिलच आम्ही मराठा आरक्षणासाठी लावले आहेत. पण फक्त वकिल लावून उपयोग नाही. महाराष्ट्राच्या मत्रिमंडळातील कोणत्या तरी नेत्यानं २७०० पानांचा अहवाल वाचला आहे का?, असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाचं देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले आणि सर्वोच्च न्यायालयातही एक वर्ष आरक्षण टिकलं पण त्यानंतर आरक्षणावर स्थगिती आली. आठ तारखेपासून साधारणत २० पर्यंत शेवटची सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयात ही केस नीट लढवावी नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Team Global News Marathi: