रिलायन्स च्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह महाराष्ट्राला रुग्णांसाठी ऑक्सीजनचा पुरवठा करणार आहे. रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा केला जाणार आहे. उच्च दाबाने टँकरमध्ये साठवून रिलायन्स महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा करणार आहे. Maharashtra to get 100 MT oxygen from Ambani owned Reliance’s Jamnagar plant

महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोजा येथील लिंडे प्रकल्पातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन ऑक्सीजन खरेदी करण्याचा निर्णय झाला.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, पनवेलचे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे उपस्थित होते.

ऑक्सिजन प्रमाणे नायट्रोजन चा पुरवठा करणारे छोटे टँकरही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरले जावेत याकरिता सर्व संबंधित प्रशासनाला दिले.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेश या तीन भागांमध्ये आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमध्ये रस्ते मार्गाने अथवा विमानाने जाणे शक्य आहे. मोठे विमानतळ असल्यामुळे गुजरातमधून विमानाने मुंबई, पुणे आणि नागपूर यापैकी कोणत्याही शहरात ऑक्सीजन नेणे शक्य आहे. ऑक्सीजनच्या विमानतळ ते हॉस्पिटल या प्रवासाकरिता रस्ता हा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे रिलायन्स कंपनी महाराष्ट्राला वेगाने ऑक्सीजन पुरवू शकेल हे लक्षात आल्यामुळे राज्य शासनाने जामनगर प्रकल्पातून ऑक्सीजन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात येथील जामनगर प्रकल्पातून खरेदी केलेल्या ऑक्सीजनचा राज्यात जिल्हावार मागणीनुसार पुरवठा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाकडून त्यांच्या मागणीची माहिती मागवली आहे.
निवडक खासगी कंपन्या महाराष्ट्रातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करतात. या सर्व प्रकल्पांना ऑक्सीजन निर्मिती आणि साठवण क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रकल्पांकडे ऑक्सीजनची मोठी मागणी नोंदवली जाणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

वाहतुकीत अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन नायट्रोजनचा पुरवठा करणाऱ्या टँकरमधून राज्यात ठिकठिकाणी ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची योजना असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सीजन यांचा तुटवडा आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान शेजारील राज्यांमधून ऑक्सिजनच्या विमान वाहतुकीसाठी हवाई दलाला मदत करावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केली होती. त्यानंतर शिंदे यांची ही माहिती आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील आरोग्य सेवा प्रणालीवर मात करून, कोविड -१९ मधील पीडित लोकांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा साठा कमी पडत असून वाढत्या कोरोनव्हायरस संकटावर मात करण्यासाठी राज्याला मदत करावी असे आवाहन केले होते.

मंगळवारी पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कोविड नियम लावण्याची घोषणा केली. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी हवाई दलाला मदत करावी अशी विनंती त्यांनी केंद्राला केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी पंतप्रधानांना जवळच्या राज्यांमधून वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आयएएफची मदत द्यावी अशी विनंती

.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: