‘महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच’

 

सध्या जगभरात गाजत असलेल्या तालिबानी मुद्द्यावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात तालिबानची थेट RSS शी तुलना करून अनेकांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्या पाठोपाठ तालिबान्यांनी आपल्या अंतरिम सरकारची घोषणा देखील केली. यात एकूण ३३ जणांचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. पण यात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी एक ट्विट केलं असून यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबानसोबत तुलना केली आहे. यासाठी त्यांनी समाजात महिलांना प्रशासकीय कामांत सहभागी कर न देण्याच्या भूमिकेचं उदाहरण दिलं आहे. “महिला मंत्रिपद देण्याच्या लायकीच्या नाहीत असं तालिबानी म्हणतात. तर महिलांनी घरातच राहून संसार सांभाळायला हवं असं मोहन भागवत म्हणतात. मग दोघांची विचारधारा एकच नाही का?”, असं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

यावेळी दिग्विजय सिंह यांनी RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली होती या विधानामध्ये भागवत म्हणतात की, “लग्न म्हणजे पती-पत्नी यांच्यातील एक करार आहे. यात पत्नी घराचा सांभाळ आणि इतर गोष्टींची काळजी घेते. तर पती कामकाज व महिला सुरक्षेची जबाबदारी सांभाळतो”, असं त्यांनी म्हंटल होत.

 

Team Global News Marathi: