मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये करणाऱ्यांना संजय राऊतांनी झापलं

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये करणाऱ्यांना चपराक बसली असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले आहे, असे म्हणत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा लगावला.

राऊत म्हणाले की, मी वारंवार सांगत होतो की मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणवर येईल सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मुख्यमंत्र्याचे दर्शन झाल्याने राज्याची जनता उत्साहात आणि आनंदात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

आज देशात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Global News Marathi: