रिफायनरी विरोधकांची मनसे नेते सतिश नारकरांनी केली पोलखोल

 

सध्या कोकणात रिफायनरीचा मुद्द्या तापत असून काही मूठभर लोक या रिफायनरीला विरोध करून कोकणाच्या विकासाला आळा घालण्याचे काम करत आहे आज रिफायनरीमुळे कोकणचा होणारा विकास आणि तेथे निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी यावर पाणी फेरण्याचे काम काही समाजकंटक करत आहे या विरोधात आता मनसे उपाध्यक्ष सतिश नारकर यांनी थेट ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची पोलखोल करत त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणले आहे.

सतीश नारकर आपल्या ऑडिओ क्लिप मध्ये म्हणतायत की, जातीपातीच राजकारण करून त्यावेळेस नाणार प्रकल्प बंद पाडण्यासाठी 3 वर्षापूर्वी अध्यादेश काढला त्यावेळी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांनी सामान्य स्थानिक नागरिकांना आम्ही फलोत्पादनाच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून सहकारी तत्वावर तुमच्यासाठी गृहउद्योग आणू त्यासाठी लोकांच्या जमिनी लिहून घेतल्या पण या तीन वर्षात अधिसूचना रद्द झाल्यानंतर त्यांनी किती खऱ्या अर्थाने दिलेली आश्वासने पूर्ण केली ,किती लोकांना रोजगार दिले, किती लोकांसाठी फलोत्पादनाचे प्रकल्प आणले, किती लोकांना नोकऱ्या दिल्या हे सांगायला हवे, मात्र यांना फक्त आश्वासने देऊन भविष्यात कोकणाचा होणारा विकास थांबवायचा आहे.

पुढे ते विरोधकांना म्हणतायत की, तुम्ही आज मुंबईत येऊन स्थायिक झाला आता ते पैसे कोणत्या मार्गाने कमावले हा वेगळा विषय आहे परंतु इकडे पैसे कमावल्यानंतर आपल्याबरोबर आपल्या गावातला कोणीही भाऊबंद इतका सदन होऊ नये त्यासाठी त्याला खोटी आश्वासने द्यायची आणि अशा प्रकारे घाणेरडे राजकारण करायचं हीच नीती अवलंबली आहे मात्र आताची पिढी आणि येणारी पिढी फार हुशार आहे हे सर्व घाणेरडं राजकारण जाणते त्यामुळे अस जातीपातीचे राजकारण केले तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तसेच आज ना उद्या लोकांचे डोळे उघडतील मात्र हा प्रकल्प परत गेला तर आपण दारिद्र्यातच राहणार अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Team Global News Marathi: