लाल किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची स्वप्ने बघू नका, चंद्रकांत पाटलांचा टोला

 

मुंबई | पाच राज्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज भाजपच्या बड्या नेत्यांनी मुंबईत जल्लोष साजरा केला होता अशातच आता भाजपा महाराष्ट्र कार्यालयात जसल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षाला जोरदार टोला लगावला होता.

भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. 50 वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपची ही विजयी घोडदौड 2024 मध्येही सुरुच राहणार असल्याचे पाटील म्हणाले. भाजपला टक्कर देणं विरोधकांसाठी फार अवघड झालं आहे. भाजपाने ज्या 4 राज्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्या राज्यांच्या घराघरातील स्त्रियांनीही भाजपालाच मतदान केल्याचे पाटील म्हणाले.

विरोधकांना वाटत होते की भाजपचा धुव्वा उडेल, पण त्यांचाच धुव्वा उडाला असल्याचे पाटील म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळून गोव्यात जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली आहेत. 50 50 वर्ष राजकारणात घालवल्यानंतरही काय यांचा अनुभव असतो असे पाटील म्हणाले.

2024 ला सुद्धा लाल किल्ल्यावर भाजपचाच भगवा फडकणार आहे. यावेळी तुम्हाला आमच्यासोबत यायचे असले तर येऊ शकता, पण तुम्ही शिवसेनेचा भगवा लाल किल्ल्यावर फडकवण्याची स्वप्ने बघू नका असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला. उत्तर प्रदेशमध्ये आणि गोव्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सभेला गेला त्या ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले असल्याचे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: