‘त्या’ १२ आमदारांना बघून भास्कर जाधवांचा तीळपापड, सुनावले खडेबोल

 

पाच राज्यांच्या निवडणुक निकालांची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळात मात्र वेगळाच आखाडा रंगलेला पाहायला मिळाला असून संततधार आणि वर्धक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे अशातच महाविकास आघाडी सरकारमधील नेते भास्कर जाधव हे भाजपाच्या निलंबित आमदारांंना सभागृहात पाहून चांगलेच संतापले.

भास्कर जाधव यांनी निलंबित केलेले हे १२ आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा सभागृहात दाखल झाले. भास्कर जाधव यांना ही गोष्ट सहन झाली नसून त्यांची चिडचिड होताना दिसली. ‘यांना कसं काय घेतलं?’ असा प्रश्न त्यांनी सभागृहाला आणि सरकारला यावेळी विचारला.

यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी थेट न्यायपालिकेचे अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाहीत कायदेमंडळ मोठांआहे का न्यायपालिका मोठी आहे हे सिद्ध करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने गमावली असे जाधव यांनी म्हटले आहे. तर उद्या ऊठसूट कोणतेही कोर्ट सभागृहाच्या अधिकारांमध्ये, निर्णयांमध्ये हस्तक्षेप करेल अशी भीतीही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: