रेकॉर्ड : अवघ्या २१ व्या वर्षी आर्या राजेंद्रन ही तरुणी बनणार या मोठ्या शहराची महापौर

अवघ्या २१ व्या वर्षी आर्या राजेंद्रन या तरुणीची महापूर पदी नियुक्ती

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील रहिवाशी असलेली आर्य राजेंद्रन या तरुण विद्यार्थिनीने सर्वात कमी वयात महापौर पद पटकावले आहे. अवघ्या २१ व्या वर्षी आर्या राजेंद्रन हिची महापौर पदी विराजमान होऊन देशात नवा इतिहास रचला आहे. इतक्या कमी वयात महापौर पदी निवड होणारी आर्या देशातील पहिली “तरुण महापौर” ठरली आहे.


आर्या राजेंद्रन सध्या बीएससी गणिताची विद्यार्थिनी आहे. तिरुअनंतरपुरम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिने पहिल्यांदाच मतदान केले होते आणि ती उमेदवार म्हणूनही उभी राहिली होती. आता ती चक्क महापौरपदी विराजमान होणार आहे. ती केरळची आणि देशातील सर्वात कमी वयाची महापौर ठरलेली आहे. तिचे वडील इलेक्ट्रिशियन तर आई एलआयसी एजंट म्हणून काम करतात.

आर्या सीपीएम पक्षाच्या तिकीटावर मुडावनमुगल विभागातून निवडून आलीय. २१ डिसेंबर रोजी तिचा शपथविधीही पार पडला. आता, सीपीएमकडून आर्य राजेंद्रन हिची महापौरपदी निवड करण्यात आलीय. महापौरपदाचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. मी त्याचं पालन करीन असे तिने बोलून दाखविले होते.

निवडणुकीदरम्यान जनतेने मला पसंती दिली कारण मी एक विद्यार्थी आहे आणि लोकांना एक शिक्षित व्यक्ती प्रतिनिधी म्हणून हवा होता. मी माझे शिक्षण सुरू ठेवतानाच महापौर म्हणून माझी कर्तव्यं पार पाडणार आहे’ असे तिने बोलून दाखविले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: