दिलासादायक :राज्यातील रूग्णसंख्येत घट, २४ तासांत ४ हजार ३५९ नव्या रूग्णांची वाढ, तर ३२ जणांचा मृत्यू

दिलासादायक :राज्यातील रूग्णसंख्येत घट, २४ तासांत ४ हजार ३५९ नव्या रूग्णांची वाढ, तर ३२ जणांचा मृत्यू

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात २४ तासांत ४ हजार ३५९ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३२ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण ५२ हजार २३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३९,४४७ झाली आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे.

राज्यात आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ७६,३९,८५४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३,१३,४५७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६३,०२,७८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,३९,४४७ (१०.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आज २३७ ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात ओमिक्रॉनचा एकूण आकडा ३ हजार ७६८ इतका आहे. यापैकी ३ हजार ३३४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 

दरम्यान, काल राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज ४ हजार रूग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: