खरोकर १०० कोटी पूर्ण झाले आहेत का ? मोदींच्या भाषणावेळीच संजय राऊत यांनी उपस्थित केला सवाल

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशातील तमाम जनतेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी देशभरातील तमाम देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. आज कोरोनाच्या विळख्यात असलेल्या भारताला बाहेर काढण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी लसीकरणाच्या कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांची आभार मानले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. राऊतांनी १०० कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले की, १०० कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. डोस देण्याच्या बाबतीत आपला देश जगात १९ व्या स्थानी आहे. काहीजणं म्हणत आहेत. ३३ कोटीच दोन डोस झालेत. तर काहींना दुसरा डोस मिळालाच नाही. अशी शंका राऊत यांनी आज उपस्थित केली आहे.

एखाद्या गोष्टीचा उत्सव करायचा म्हटलं, सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर या देशात नवा पायंडा पडलाय. तर आपण मोदींच्या या उत्सवात शामील होऊयात. हा एक इव्हेंट सुरु आहे. पण खरोखरच १०० कोटी डोस झाले असेल तर ती गौरवाची बाब आहे. असेही राऊत म्हणाले आहेत. आता या शंकेवर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: